शिवसेना, युवासेनेसह विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, शेवंगावकरांची उत्स्फूर्त हजेरी
शेवगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शेवगाव शिवसेनेच्या वतीने जल्लोषात जयंती साजरी केली. यावेळी विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
शेवगाव शिवसेना व युवासेनेचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मानवंदनेसाठी शेवगावकर तसेच सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळीने आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी घाडी, जिल्हा सह - संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हा प्रमुख (दक्षिण) राजेंद्रजी दळवी, तालुका प्रमुख ऍड अविनाश मगरे, शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, युवासेना तालुकाप्रमुख शीतल पुरनाळे, तालुकासंघटक महेश पुरनाळे, प्रसिद्धी प्रमुख उदय गांगुर्डे, उपतालुका प्रमुख अशोक शिंदे, उपस्थित होते.
लक्ष्मण टाचतोडे, कृष्णा कुऱ्हे, विठ्ठल घुले, देविदास चव्हाण, युवासेनेचे शहरप्रमुख महेश मिसाळ, ऍड किरण जाधव (ग्रामपंचायत सदस्य, नागलवाडी), सुनील जगताप, ऍड अतुल लबडे, अक्षय बोडखे, गणेश ढाकणे, गणेश पोटभरे, कानीफ कर्डीले, कृष्णा बोंबले, ज्ञानेश्वर धनवडे, अरुण काटे, अशोक गवते, कृणाल साळवे, किरण मगर, रामचंद्र झिंजुर्के, भापकर, दुबे, अमोल काशीद, अमोल राऊत, गणेश चेमटे, शिवदास गर्जे, बंडू ढाकणे, अतुल बोडखे, सागर बोडखे उपस्थित होते.