क्रीडाजगत - टोकियो ऑलिम्पिक 2021मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये असे 2.50 कोटी रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली आहे.
वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर (शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत (शूटिंग), तेजस्विनी सावंत (शूटिंग), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्हर सांघिक), अविनाश साबळे (एथलेटिक्स) या 5 खेळाडूंना हे सहाय्य देण्यात आले आहे. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी कोटा मिळाला आहे.
मिशन ऑलिम्पिकअंतर्गत अशा स्वरूपाचे प्रोत्साहन देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.
तसेच यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते. या खेळाडूचे अभिनंदन करण्यात येत आहे.