नवी दिल्ली - देशातील पहिली-वहिली चालकविहिन मेट्रो रेल्वेगाडी आता दिल्लीच्या किरमिजी मार्गावरून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यसंवादद्वारे या मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर पूर्णपणे कार्यान्वित राष्ट्रीय सामायिक गमनशीलता पत्र सेवेचेही उद्घाटन केले.
ही चालकविहिन मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित आहे. मानवी त्रुटींच्या शक्यतांना दूर करणारी असल्याचे शासनाने म्हटले आहे. तसेच, जनकपुरी पश्चिम ते वनस्पती उद्यान येथे ही चालकविहिन सेवा सुरू होणार आहे. मजलीस पार्क ते शिव विहार या गुलाबी मार्गावरही २०२१च्या मध्यपासून चालकविहिन सेवा सुरू केली जाईल.
चालकविरहित प्रकारची ही देशातील पहिलीची मेट़ो असणार आहे. त्यामुळे या मेट़ोविषची प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.