शेवंगावकरांना मिळाला हक्काचा, विश्वसनिय पर्याय
सामाजिक, राजकीय वर्तुळात चर्चेची खलबते
शेवगाव : प्रलंबित स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एनसीसी सोल्जर फ्रंटचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. दुसरीकडे मात्र विद्यमान नगरसेवक, इच्छूक उमेदवार यांच्या सह सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. नागरिकांमधून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे एनसीसी सोल्जर फ्रंटच्या सदस्यांना लढण्यासाठी दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे.
एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय वातावरण अगदी तळापासून शेंड्यापर्यंत ढवळून निघाले आहे.
इलेक्शन कंट्रोल सेलची नजर
सर्वच 21 वॉर्डमध्ये असे अनिश्चिततेचे वातावरण पसरले असल्याने दोन ते चार प्रसंगी पाच प्रमुख उमेदवारांमध्ये निवडून येण्यासाठी चढाओढ असणार आहे. या सर्व राजकीय परिस्थिरीवर एनसीसी सोल्जर फ्रंटचे 'इलेक्शन कंट्रोल सेल' सदस्य टीम लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक बारीकसारीक घडामोडी टिपून आपले उमेदवार निश्चित करण्याचे काम एनसीसी सोल्जर फ्रंट मोठ्या शिताफीने करत आहे.
उमेदवार निवड निश्चिती
वॉर्ड क्रमांक 1, 3, 4, 7, 10, 11, 12, 18 मधील इच्छूकामधून एकूण 8 उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. या बाबत अंतिम निर्णय घेऊन ती लवकरच जाहीर करण्यात येतील. उर्वरित 13 वॉर्डातील अधिकृत उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.
पॅनलचे नामकरण
एनसीसी सोल्जर फ्रंट निवडणुकीसाठी 21 उमेदवार उभा करत असलेल्या पॅनलच्या नाव निश्चितीसाठी सदस्यांची मते विचारात घेत आहे. बहुसंख्य सदस्यांनी संभाव्य नावे आमच्या 'इलेक्शन कंट्रोल सेल'कडे पाठवली असून त्यामधून एक नाव निश्चित करण्याबाबत विचारविमर्ष सुरू आहे. ते सर्वानुमते ठरवून अधिकृत नाव येत्या दोन दिवसात जाहीर केले जाईल.