नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचे नवीन रुप (म्यूटेशन)समोर आल्यानंतर भारताने युरोपवरुन येणाऱ्यांसाठी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) जारी केली आहे. याअंतर्गत आज रात्री 12 वाजेपर्यंत युरोपवरुन येणाऱ्यांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करणे गरेजेचे आहे.
जर या प्रवाशांच्या शरीरात कोरोनाचे नवीन रुप आढळले, तर त्यांना स्वतंत्र आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. सरकारने सोमवारी युरोपवरुन येणाऱ्या विमानांना 23 ते 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी 22 डिसेंबरच्या रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबरच्या 11.59 पर्यंत असणार आहे.
या नवीन उपाययोजने अंतर्गत राज्य सरकारांना नवीन आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवावी लागेल. जर, राज्यात युरोपवरुन एखादा व्यक्ती आला, तर त्याची आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेची आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला इंस्टीट्यूशनल आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये राहावे लागेल.
राज्यांच्या हेल्थ अथॉरिटीला नजर ठेवावी लागेल. तसेच, अशा व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी किंवा एखाद्या खासगी लॅबमध्ये न्यावे लागतील. त्यामुळे काेरोनाबाबत सरकार पुन्हा गंभीर झाले असल्याचे स्पष्ट आहे.