अहमदनगर - अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग संपर्कप्रमुख मिलिंद बागवे, मराठवाडा विभाग प्रमुख किशोर वाघ उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद बागवे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.
सुरेश झुरमुरे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व उद्दिष्टे समजावून सांगितली. किशोर वाघ यांनी कार्यकारिणी सदस्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सदस्यांची ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या.
जिल्हा कार्यकरिणीमध्ये भगवान जगताप (जिल्हा संघटक), विशाल आठवले (जिल्हा युवा संघटक), डॉ.यशवंत पाटील (जिल्हाध्यक्ष), गोरख आळेकर (जिल्हा कार्याध्यक्ष), बाबासाहेब शेलार (जिल्हा उपाध्यक्ष), गणेश सांगळे (जिल्हा सचिव), सुदेश गायकवाड (जिल्हा कोषाध्यक्ष), संगीता मालकर (जिल्हा महिला अध्यक्षा), रघुनाथ गायकवाड (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील जगधने, सतीश मुंतोडे, अविनाश कुटे, नागेश शिंदे, गणेश केंदळे, प्रविण बळीद, राजू काळे, योगेश महाले, नारायण डुकरे, दिपक पारखे, डॉ. जगदीश राठोड, संजय वारभोर यांची निवड झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहेत. तरी संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी भगवान जगताप (संघटक), डॉ. यशवंत पाटील (जिल्हाध्यक्ष), गणेश सांगळे (जिल्हा सचिव) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.