अहमदनगर - दरोड्याचा गुन्ह्यात बंगल्याचा दरवाजा तोडून अटक केलेला आरोपी लॉरेन्स स्वामी हा बुधवारी जामिनावर मुक्त झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी भिंगार पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. लॉरेन्स स्वामी याच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यात स्वामीला पुन्हा अटक झाली आहे.
लॉरेन्स स्वामी याला दरोड्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला होता. भिंगारमध्ये २३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी पुरणचंद जोशी हे आपल्या गाडीतून जाताना त्यांना लॉरेन्स स्वामीने आपल्याकडील कार आडवी लावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात स्वामी विरोधात खंडणी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे लॉरेन्स स्वामीच्या अडचणींत वाढ झाली आहे.