पुणे - हे शहरच असे आहे की इथे प्रत्येकाला 'सेटल' व्हावे वाटते. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना चांगलाच टोला लगावला आहे.
'एकजण म्हणतो मी पुन्हा येईन, अन् दुसरा म्हणतो मी परत जाईन.. अरे पण तुम्हाला बोलवले कुणी होते ?' असे म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पुणे विधानभवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
म्हणून कडाडले अजित पवार ?
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर अलीकडेच टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होते,