अहमदनगर शहरातील लालटाकी येथील स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दुर्लक्षित, व अंधारात गडप झालेल्या पुतळ्या समोर अखेर महापालिकेने प्रकाशाची व्यवस्था केली, काटेरी झुडपे व गवताने भरलेला हा परिसर स्वच्छ करीत पुतळ्याला नवीन रंग देऊन झळाळी आणली.
रसिक ग्रुपच्या मागणीची त्वरित गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे मनस्वी आभार. महापालिकेचे सन्माननीय नगरसेवक व उत्साही व्यक्तिमत्व धनंजय जाधव यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मोलाची साथ देत आपल्या प्रभागातील दिवे, तसेच सोलर दिवे ही सामाजिक व शहराच्या हिताचा विचार करीत उपलब्ध करून दिले.
सन्माननीय शशिकांत चंगेडे, उबेद शेख, माणिक विधाते सर तसेच इलेक्ट्रिक विभागाचे व उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मनापासुन धन्यवाद.
छोट्या छोट्या दुर्लक्षित गोष्टींनी शहराचे सौंदर्य बिघडत तर असतेच पण थोर पुरुषांचा आपण अपमान करीत असतो. अशी तत्परता शहर विकासासाठी मनापासून झाली तर राज्यकर्त्यांना जनतेच्या ह्रुदयात स्थान राहील.
शहरातील सन्माननीय वृत्तपत्रे व संपादक, पत्रकार यांची लेखणी शहरातील आत्मीयतेचे खूप काही प्रश्र्न सोडवू शकते हे ही पुन्हा पुन्हा सिध्द झालं. त्याचे खूप आभार. प्रकाशाचा एक कवडसा माझ्या शहराला सुखावून गेला..!
- जयंत येलुलकर
(अध्यक्ष रसिक ग्रुप, अहमदनगर)