का विझतात हे दिवे ?
हजारोंना प्रकाश देणारे...
कोण मालवतं यांना ?
वादळं तर सामान्यांच्या आयुष्यातही
येत असतात...
मग हे कुठलं बेईमान वादळ ?
या दिव्यांना झटक्यात विझवून टाकतं.!
वादळाला कुठून मिळतात हे हक्क ?
दिव्यात असतं करुणेचं जीवन..
ते दिसतं नसत का जगाला ?
दिवा वादळांशी एकटा
झुंज देत असताना....
कुठं जातात त्याच्या प्रकाशात
मोठे होणारे हे काजवे ?
स्वयंप्रकाशाचं व्रत
निभावता निभावता
थकतात दिवे.
अंर्तयामीची उर्जा
स्वतःचं संपवून टाकतात.
हे संपवणं
इतकं सहजं नसतंच
त्या दिव्यासाठी.
पण आता 'बस्स'..!!
हाच अंर्तमनाचा आवाज
त्यांना घेऊन जातो
अज्ञाताच्या जंगलात..
पुन्हाः परत न येण्यासाठी...
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)