अहमदनगर - माणुसकीचं मन विदीर्ण करणारं चित्र! पायाची बोटे तुटलेली, पाय चालू देत नाही अन् मन बोलू देयना! आयुष्यात सर्व काही धुसरंच दिसत होतं. मनाने खचुन रस्त्यावर आयुष्य जगण्याची ती वेळ खुप विदीर्ण होती. पण अशा निराधार आणि दिव्यांग व्यक्तीसाठी 'मानवसेवा' प्रकल्प मदतीला धावून आले.
शहरातील काही संवेदनशील व्यक्तींनी याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयात कळवली होती. त्यामुळे सुदैवाने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात त्याला प्राथमिक उपचार मिळाला. पण अंथरुणावर लोळत पडलेलं धड कोण सांभाळील? असा प्रश्न होता.
या निराधारांना तर पडलाच पण जिल्हा रुग्णालयाला सुध्दा पडला. अखेर नाकारलेल्या या निराधार दिव्यांगांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाने आपले मानुन शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी मायेचा आधार दिला, अशी माहिती या प्रकल्पाचे संचालक दिलीप गुंजाळ यांनी दिली आहे.