मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के,
पुणे पदवीधर 50.30 टक्के,
नागपूर पदवीधर 54.76 टक्के,
अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के,
पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के
तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.