'शरीर सोन्याचे, अन कान पितळेचे', ही म्हणं कितीतरी जणांनी ऐकली असेल.. अर्थही माहित असेलच...पण प्रत्यक्ष जगतानाही याचा प्रत्यय येतच असतो.
कुंटूबप्रमुख जर हलक्या कानाचा म्हणजे दुसऱ्यांनी काहीही सांगितले तर हे एक बाजू ऐकून व्यक्त होत असतात... आणि काही वेळा निरपराध भरडलेला जातात.. त्यामुळे माणूस भलेही कितीही चांगला असू द्या पण त्याचे कान हलके नकोत.
इथे अकबर आणि बिरबल या जोडीच्या कथा आठवतात. खरंतर या कथेत बिरबलाचे पारडे नेहमीच जड असायचं. हर एका गोष्टीचं उत्तर बिरबलाकडे सापडायचं. त्याच्या या असामान्य बुध्दीमत्तेचा हेवा लोकांना वाटला तर नवल नव्हते.
लोक बिरबलाला अकबराच्या नजरेतून उतरवण्याचे वेगवेगळे फंडे काढत त्याला बदनाम करण्यासाठीही क्लुप्ती करत... पण राजा अकबर ख-या अर्थाने राजा... त्याचे कान इतके जड की तो कधी या गोष्टींवर विश्वास ठेवत नसे. तो शहानिशा करी.. आणि बिरबलाला न्याय मिळत असे.
आता असे अकबरासारखे जड कान जरासे दुर्मिळच झालेत... आपल्या आयुष्यात माणसं जपायची असतील तर 'दुसरी बाजू' ऐकायची कानांची क्षमता तयार करायली हवी.. संगीत आणि गीत ऐकायला कान तयार जसे तयार हवेत तसे सत्याला सामोरे जाणारे कान तयार असायला हवेत. होय ना ?
तुमचे कान कसे आहेत ?
जड की हलके ?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)