सोशल मीडियावरील मैत्रीची किंमत मोजली ७० लाखांत

अहमदनगर: सोशल मीडियावर मैत्री करून नंतर प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने एका उच्चशिक्षित व्यक्तीला ७० लाखांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका नायजेरीन नागरिक असलेल्या व्यक्तीला अटक केेली आहे. रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून बनावट इमेल आणि कागदपत्रांचा वापर करून, या आरोपीने फसवणूक केली.

थेट दिल्लीत जाऊन नगरच्या पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. 

पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे, फौजदार प्रतिक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरूण सांगळे, पुजा भांगरे यांच्या पथकाने आरोपीचा ठावठिकाणा मिळविला आणि त्याला जेरबंद केले.

सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२० या काळात हा गुन्हा घडला आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने नगर सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. अमेलिया स्मिथ असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने प्रथम जाळे टाकले. भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनीकडून आर्युवेदिक कच्चा माल खरेदी करण्याचे कारण त्यांनी दिले.

दिल्ली, वाराणसी, अरूणाचल प्रदेश येथील विविध बँकेचे ६ खात्यांची खोटी ओळख सांगून मैत्री केली. समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसल्याचे पाहून खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे भासवत विविध कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरवात केली. त्यासाठी आरबीआयच्या नावाचाही चुकीचा वापर केला. 

सरकारी कार्यालयांच्या बनावट ईमेल आकाऊंटवरून बनावट कागदपत्रे पाठवून आरोपी विश्वास संपादन करीत होते. त्यांनी फिर्यादीकडून ७० लाख, ८७ हजार रुपये उकळले. लॉकडाऊनंतर व्यवसाय होत असल्याचे पाहून फिर्यादी विश्वास ठेवत गेले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !