सकाळी सकाळी आमच्या फॅमिली ग्रुपवर महात्मा सोसायटीत गवा दिसल्याची बातमी आली. अर्चिसचं आणि प्रीताचं अशी कुटुंबातली दोन घरं त्या सोसायटीत आहेत त्यामुळे ती खबर त्यांच्याकडूनच मिळाली. गव्याचे फोटो, व्हिडिओ आमच्या नीलने अगदी घरातून घेतले. उमदं जनावर! त्या गव्यापुढे पुढच्या पाच-सहा तासांत काय वाढून ठेवलंय याचा अंदाज त्यावेळी ना त्याला असेल, ना आम्हाला आला.
मात्र पुढे नेहमीच्याच पद्धतीने तो गवा म्हणजे जणु आपल्या शहरावरचं मोठं आक्रमण आहे अशा पद्धतीने त्याच्याशी युद्ध झालं.... बघ्यांची गर्दी, पोलीस, मीडिया, वनविभागाचे प्रयत्न, या सर्वाने घाबरलेल्या, बिथरलेल्या, जखमी झालेल्या त्या उमद्या जनावराचेे अखेर प्राण गेले. (याला आपल्याकडे 'रेस्क्यू' म्हटलं जातं! 'बघे' ही एक निष्क्रिय दिसणारी अत्यंत क्रूर जमात आहे असं माझं मत आहे. त्या दोनचार तासात त्या गव्याला 'मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते -' अशी वेळ आणली असणार सर्वांनी मिळून!)
सकाळी हसतखेळत गव्याची बातमी देणाऱ्या माझ्या कुटुंबातल्या दोघींनी लिहिलेलं हे तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं.
चक्रव्यूहात अडकलेला मी
कुठे जाऊ
कसा जाऊ
दूरवर झाडं दिसतायत
गवत दिसतंय
जंगलाचा वास ही येतोय ..
पण..
या दोन पायाच्या प्राण्यांनी
बंद केलंय मला
मी तर काहीच मागितलं नव्हतं
जसा आलो तसा गेलो असतो की
काय घाई होती तुम्हाला ..
समजलच नाही मला ..
कोणाला विचारू ..
कसं विचारू ?
यांना ऐकायला कान आहेत
पण ऐकू येत नाही
बघायला डोळे आहेत
पण दिसतच नाही त्यांना ...
मन आहे म्हणे त्यांना..
पण..
?
- प्रीता नागनाथ
अर्चिस लिहिते -
This beautiful and handsome Indian Gaur's death is not just a mishap or an accident, but is a murder. Murder of a rare, shy, vegetarian, mostly nocturnal young innocent animal. The behavior of human beings can just not be excused. I wish lockdowns stay forever and animals other than human beings get a chance to roam around the globe freely, till we, the humans learn everything about animals and their behaviors and respect the flora and fauna.
फोटो - नील (त्याने किंवा आम्ही कोणीही ते शेअर केले नव्हते कुठेही.)
- सुनीती सुलभा रघुनाथ (पुणे) यांच्या फेसबुक वॉलवरून साभार