अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी १३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे.
गुरूवारी सायंकाळी सहा वाजले पासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १,१२६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत ४४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०६, पाथर्डी ०१, राहाता ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले ०१, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहाता ०४, राहुरी ०४, संगमनेर ०६, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ४४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३०, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०२, राहाता ०१, संगमनेर ०३, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, अकोले ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पाथर्डी ०९, राहाता १०, राहुरी ०१, संगमनेर २२, शेवगाव १५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०३,इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या - ६६,१३३
- उपचार सुरू असलेले रूग्ण - १,१२६
- मृत्यू - १,०३२
- एकूण रूग्ण संख्या - ६८,२९१
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)