नवी दिल्ली - मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानातील एका न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 'टेरर फंडिंग' प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. या शिक्षेसह त्याच्यावर २ लाख रुपचांदा दंडही ठोठावण्यात आला आहे.
70 वर्षीय सईदला यापूर्वी अशाच प्रकारच्या चार प्रकरणात 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 5 प्रकरणात आतापर्यंत सईदला 36 वर्षांची शिक्षा मिळाली आहे. सईद हा सध्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात जेरबंद आहे. त्याला गेल्या वर्षी 17 जुलैला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो तुरुंगात कैद आहे.
फेब्रुवारीमध्ये टेरर फंडिंगप्रकरणी कोर्टाने त्याला 11 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर आणखी दोन प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सईद याच्या विरोधात टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग आणि अवैध कब्जा मिळवण्यासह 23 गुन्हे दाखल आहेत. सईद जुलै 2019 पासून तुरुंगात आहे.