अहमदनगर - तोफखाना, नवरंग व्यायाम शाळेजवळील रहिवासी बबन उर्फ नरसय्या गुंडू यांचे मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते५९ वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होेते.
न्यायालयातील कर्मचारी रोहित व सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस दलातील कर्मचारी राहुल गुंडू यांचे ते वडिल होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.