कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्याला विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डावे पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. डाव्या पक्षांनी यापूर्वीच कॉंग्रेसशी युती करण्याची तयारी दर्शवली होती. आता कॉंग्रेसनेही डाव्या पक्षांसोबत निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कॉंग्रेस आणि डाव्यांनी मिळून निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती कॉंग्रेस पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने डाव्यांशी युती केली आहे.
खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. डाव्या पक्षांसोबत युती करण्यास काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दिला आहे. सन २०१६ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बंगालमध्ये कॉंग्रेस आणि डावे, भाजप आणि ममता बॅनर्जीं यांच्यात निवडणूक होणार आहे.