इंग्लंडहून आलेल्या नागरिकांची माहिती कळवा

 अहमदनगर - कोविड आजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून इंग्लंडमध्ये या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी नागरिकांना आवाहन करताना इंग्लंडहुन परतलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी, असे सांगितले आहे. 

तसेच शहरातील नागरिकानी आपल्या आजूबाजूला कोणी नागरिक इंग्लडहुन आलेले असतील, तर त्यांची माहिती अहमदनगर महापालिकेला कळवण्याचे आवाहन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !