कोण ठरणार या दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ?

नवी दिल्ली - आयसीसीने मंगळवारी अवॉर्ड्स ऑफ डिकेड्ससाठी खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. या दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणार, याची उत्सुकता यामुळे अधिकच ताणली जात आहे. लवकरच याला निर्णय जाहीर होणार असून क्रीडारसिकांचे सगळे लक्ष सध्या या यादीकडे लागलेले आहे.

या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला सर्वाधिक पाच गटांत नामांकन मिळाले आहे. दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, दशतकातील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू, कसोटी खेळाडू, टी-२० खेळाडू आणि स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्कारासाठी त्याला नामांकन आहे. 

तसेच आर. अश्विन देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या शर्यतीत आहे. यादरम्यान रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीचे नाव दशकातील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचा निर्णय मिळालेल्या मतदानाच्या संख्येआधारे ठरणार आहे. पण यात सध्या काेहलीच्या नावाचीच जाेरदार चर्चा आहे.

महिलांच्या गटामध्ये भारताची स्टार महिला क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला दोन गटांत नामाकंन मिळाले आहे. तिचे नाव दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि महिला वनडे खेळाडूंमध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याचबरोबर झुलन गोस्वामीला उत्कृष्ट वनडे खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले आहे.

दशकातील सर्वोत्कृष्ट 'नामाकंनातील खेळाडू -

सर्वोत्कृष्ट खेळाडू - विराट कोहली, मलिंगा, स्टार्क, डिव्हिलर्स, रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी, कुमार संगकारा.

सर्वोत्कृष्ट कसोटीपटू - विराट कोहली, केन विल्यम्सन, स्मिथ, जेम्स अँडरसन, हेराथ, यासिर शाह.

सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू - विराट कोहली, राशिद, ताहिर, फिंच, मलिंगा,ख्रिस गेल, रोहित शर्मा.

स्पिरिट ऑफ द क्रिकेट - विराट कोहली, विल्यम्सन, मॅक्युलम, मिस्बाह, महेद्र धोनी, अन्या श्रुबसोल, कॅथरीन ब्रंट, जयवर्धने, डॅनियल व्हिटोरी.

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू - मिताली राज, एलिस पेरी, मेग लेनिंग, सूजी बेट्स, स्टेफनी टेलर, सारा टेलर.

सर्वोत्कृष्ट महिला वनडेपटू - मिताली, झुलन, लेनिंग, एलिस पेरी, सुजी बेट्स, स्टेफनी टेलर.

सर्वोत्कृष्ट महिला टी-२० खेळाडू - मेग लेनिंग, सोफी डिव्हाइन, एलिस पेरी, डिएंड्रा डॉटिन, एलिसा हीली आणि अन्या श्रुबसोल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !