पिंपरी-चिंचवडच्या 'ड्रीमव्हिजन' नेटवर्किंग कंपनीविरोधात लातूरमधून 'प्रहार'

कंपनीच्या मोशी कार्यालयासमोर ऑफिस बंद आंदोलन करण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

नाशिक : मोशी (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या नेटवर्क मार्केटींग कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात सध्याच्या राज्य सरकार मध्ये मंत्री असलेले बच्चूभाऊ कडू संस्थापक-अध्यक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर शाखेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

लातूर जिल्ह्यातील लातूर, केज, कळंब आणि अंबाजोगाई या चार तालुक्यातील शेकडो गुटवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मोशी येथील स्पाईन रोडवरील स्पाईनसिटी मॉल मधील कार्यालयासमोर सर्व गुतवणूकदारांसह आंदोलन करणार असल्याचे पत्र कंपनीचे सिएमडी दिनेश कुरकुटे यांना 11 नोव्हेंबर रोजी पाठविले आहे. 

दरम्यान, या कंपनीचे संस्थापक सिएमडी दाम्पत्य असणारे दिनेश भगवान कुरकुटे आणि दीपिका दिनेश कुरकुटेने या बंटी-बबली दाम्पत्याने फसवणुकीचा डबलगेम रचल्याचे फसवणूक झालेल्या गुतवणूकदारांनी दिलेल्या माहितीवरून समोर येत आहे. 

प्रहार जनशक्ती पक्ष लातूर चे अध्यक्ष दादासाहेब काळे यांची स्वाक्षरी असलेल्या पक्षाच्या लेटरहेड वर 'ड्रीमव्हिजन'चे सिएमडी दिनेश कुरकुटे यांना पाठविलेल्या पत्रात, म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लातूर, केज, कळंब आणि अंबाजोगाई या चार तालुक्यातील शेतकरी, कामगार 350 व्यक्तींना 24 महिने 19500 रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम मध्ये 2 लाख 2 हजार 500 रुपया प्रमाणे लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच इतरांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. 

मात्र हे आश्वासन कंपनीने पूर्ण न केल्याने गुतवणूकदारांनी कंपनीकडे चौकशी केली असता कंपनी तोट्यात असून परतावा देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुतवणूकदारांच्या लक्षात आले. आता कंपनी परताव्याच्या पैशांच्या बदल्यात कंपनीने खरेदी केलेली जमीन बळजबरीने गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारण्यात येत आहे. 

गुंतवणूकदारांची फसवणूक थांबवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कंपनीच्या मोशी येथील कार्यालयासमोर ऑफिस बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण...

संचालक कुरकुटे दाम्पत्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी ड्रीमव्हिजन फॉर यू ट्रेड प्रा.लि. या नेटवर्क मार्केटिंग कंपनीची स्थापना केली.  कुठल्याही प्रकारे कायदेशिर नसलेला 2 लाख भरा आणि तिपटीने परतावा मिळवा असा फसवा मनिसर्क्युलेशन प्लॅन  काढून या बंटी-बबली जोडीने महाराष्ट्रासह जवळच्या गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांमधील हजारो गुतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. 

तसेच राज्यातील पुणे, मुबई, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अकोला, सोलापूर आदी जिल्ह्यातील हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. 

पुण्यातील प्रकरण कंपनीने दाबले

ड्रीमव्हिजन कडून फसवणूक झालेल्या पुण्यातील काही गुंतवणूकदारांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात कंपनी विरोधात तक्रार अर्ज दिला असल्याचे समजते. मात्र येथे पोलिसांना हाताशी धरून कंपनीने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही गुंतवणूक दारांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. 

नागपूर पोलिसात तक्रार दाखल

दरम्यान, ड्रीमव्हिजन कंपनीच्या फसवणुकी विरोधात नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातही तेथील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांशी साटेलोटे करून प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न कंपनीकडून सुरू असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून सांगण्यात आले.

'पिंपरी-चिंचवड पोलीसात'ही होणार गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड परिसरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार देखील कुरकुटे विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. आज या बाबतच्या हालचाली सुरू आहेत. कंपनीचे ऑफिस याच परिसरातील मोशी येथे असल्याने येथील पोलिसांकडून कंपनीचे ऑफिसवरही कायदेशीर कारवाई आज होऊ शकते.

फोनवरून नाशिकमधील गुंतवणूकदाराला धमकी

नागपूर येथे गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर कपणीविरोधात कायदेशीर कारवाई तेथील पोलीस करत आहेत. याप्रकरणी नाशिक मधील एका गुंतवणूकदारास सिएमडी दिनेश कुरकुटे, सीईओ अमितकुमार पोंदे आणि मॅनेजर नवनाथ मगर हे फोन करून तुम्ही नागपूरला पोलिसांसमोर हजर व्हा, अन्यथा पोलीस तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतील, अशी धमकी देऊन वारंवार त्रास देत आहेत. या त्रासामुळे आपले काही बरेवाईट झाल्यास त्यास हे तिघे जबाबदार असतील, असे संबंधित गुटवणूकदारांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

मुख्य सूत्रधार त्रिमूर्तिचा स्कॅम

कंपनी सिएमडी दिनेश कुरकुटे, सीईओ अमितकुमार पोंदे आणि मॅनेजर नवनाथ मगर ही त्रिमूर्ति या मनिसर्क्युलेशन स्कॅम मधील मुख्यसूत्रधार आहेत.  हे तिघेही गुटवणूकदारांनी पैसे मागितल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. तसेच तुमच्यावरही पोलीस कारवाई होईल असे सांगून भीती घालतात.  यापैकी कुरकुटे हे पिपरी-चिंचवड मधील एक बड्या राजकीय व्यक्तीचे तर  मगर हे सोलापूरचे एक बडे राजकीय नेते यांची जवळीक असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना भीती घालत असल्याचे समजते. राजकीय लागेबांधे सांगून पोलिसांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

ड्रीमव्हिजन' कंपनीने केलेल्या फसवणुकीचा एमबीपी लाईव्ह 24 कडून भांडाफोड

पुढील भागात वाचा ...  

भाग 1

कोण आहे दिनेश कुरकुटे ?

भाग-2

मंचरच्या 'बंटी-बबली' चा फसवणुकीचा 'डबल गेम'

भाग-3

परताव्याच्या कोकणातील जागेतूनही बंटी-बबली कमवतेय माया

 भाग-४

जागा नावावर करायला नेऊन गुंतवणूकदारांना 'कुरकुटे'ची दमबाजी 

भाग-5

'एमसीए'ची फसवणूक

भाग-6

आयकर विभागाला लावला चुना

भाग- 7

कायद्याला फासली हरताळ

भाग-8

अनेक फसव्या नेटवर्क ऑनलाइन कंपन्याची तरुणाईला भुरळ

-------------

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !