टेक्नॉलॉजी - कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्याबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी गूगलने आपल्या 'मॅप्स'मध्ये नवीन फीचर्स आणले आहे. कंपनीने 'गूगल असिस्टेंट ड्राइविंग मोड' हे नवीन फीचर आणले आहे. या मोडमधून अँड्रॉयड आणि आयओएस यूजर्सला रियल टाइममध्ये कोविडशी संबंधित अचूक माहिती मिळेल.
या फीचरनुसार, जर तुम्ही घराबाहेर निघालात व तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी जायचे असेल किंवा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणच्या कोविड संक्रमितांची माहिती आधी मिळेल. सध्या देशात कोरोनाच्या संसर्गग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.
पण, दिल्ली आणि केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी देशात एकूण 38 हजार 478 नवीन रुग्ण समोर आले, तर 44 हजार 671 रुग्ण ठीक झाले आहेत. अशावेळी गूगल मॅप्सवर हे फीचर आले आहे, की जेव्हा भारतात परत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
दिल्ली सरकार गर्दीच्या ठिकाणी परत लॉकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. गूगल मॅप्स यूजरला गर्दीच्या ठिकाणांची रिअल टाइम इन्फॉर्मेशन देईल. तर, मागच्या 7 दिवसातील कोरोना रुग्णांची संपूर्ण माहितीदेखील देईल. हे फीचर्स वापरुन नागरिकांनी कोरोनापासून दूर रहावे, आपला बचाव करावा, असे आवाहन गुगलने केले आहे.