काय सांगता ! 'या' बसस्टँडवर गावठी पिस्तुल विक्री होते ?

अहमदनगर - शहरातील तारकपूर बसस्थानक येथे दोघांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.चुन्नीलाल सुभाराम पावरा (वय २१ रा. हिवरखेडा , ता. शिरपूर, जि. धुळे), दिलीप जयसिंग पावरा (वय २०, शिरपूर जि.धुळे ) असे आरोपीचे नावे आहेत. हे दोघे अनधिकृतपणे गावठी पिस्तुलांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दि. २६ नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या टीमने तारकपूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावला. दोन इसम संशयीतरित्या तारकपूर बसस्थानक परिसरात फिरत असताना दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे चुन्नीलाल सुभाराम पावरा, दिलीप जयसिंग पावरा असे सांगितले. 

फौजदार गणेश इंगळे यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस असा मुददेमाल मिळून आला. तो जागीच जप्त करुन सदरबाबत तोफखाना पोलिस स्टेशनमध्येे भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई तोफखाना पोलिस करीत आहेत. 

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फाैजदार गणेश इंगळे, कॉन्स्टेबल मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, बाळासाहेब मुळीक, सचिन आडबल, विशाल गवांदे , शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, संभाजी कोतकर, रविंद्र घुंगासे, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्के आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !