अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व कामकाज पाहण्यासाठी नगरचे विधिज्ञ अभिषेक भगत यांची जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांच्या न्यायालयातील कामकाज, जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे व खाते प्रमुखांकडील न्यायालयातील सर्व प्रकारणांचे कामकाज पाहणे, न्यायालयीन विषयी सल्ला देणे व मार्गदर्शन करणे आदि जबाबदार्या भगत यांच्यावर सोपवल्या आहेत.