रेडिओवर एका मोबाईल कंपनीच्या जाहिराती आहेत. एक शेजारचे काका एका मुलीला म्हणतात की, "नुसतं गाण म्हणतेस आता (कमावण्यासाठी) कर काहीतरी". ती मुलगी म्हणते मी गाणच म्हणतेय. लोकांनी मला छान प्रतिसादही दिलाय.अशा दोनचार जाहिराती आहेत.
एखादी सासूची नणंदेची मैत्रिण येते आमच्या मैत्रीणींला नीट सांभाळा, आमची मैत्रिण खूपच चांगली आहे. अर्थातच सासू, नणंदेने असं बोलायला सांगितले असते. काही वेळा नसतेही. पण कुणी कुणाला सांभाळयचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो... दुसरी बाजू माहित असते का आपल्याला !!! हा भोचकपणा काहीच्या स्वभावात जन्मजातच असतो.
तात्पर्य हेच आहे की दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावू नका. अनाहूत सल्ले द्यायला जाऊ नका. आणि कुणी सल्ला दिलाच तर सरळसरळ दुर्लक्ष करा. हे भोचक समाजसुधारक (?) अशा कामात वेळ घालवत असतात. यात बायकांची संख्याही कमी नाही.
त्या मोबाईल कंपनीच्या जाहिराती खूपच छान आहेत. माझं आयुष्य मला कसं जगायचं आहे.. माझं करिअर मी करणार आहे तर दुसऱ्यांचा सबंध येतो कुठे...? पूर्वी एक जाहिरात यायची "ये दाग अच्छे है".. कित्ती छान होती... एकमेकींना मदतीची भावना लहान मुलांच्या मध्ये वाढीला लागावी अशी जाहिरात. याला सकारात्मक कला म्हणावी लागेल.
जाहिरातीमधून सामाजिक संदेशही देता येतो. हे या जाहिरात दिग्दर्शक आणि लेखकांनी दाखवून दिले आहे. एक जाहिरात छोट्या उद्योजिकांना प्रोत्साहित करणारी आहे. जाहिरात तयार करताना समाजातील छोट्या घटकांचा मुलांचा विचार केला पाहिजे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे.
एका साबणाची जाहिरात आहे. एक छोटी आणि तिचं मित्रमंडळ तिच्या आईचा चेहरा पहायला आलेत. का तर शाळेत आज स्पर्धा आहे. आईचा चेहरा पाहिला की म्हणे स्पर्धा नक्कीच जिंकणार, असा त्या मुलांना विश्वास आहे. अशी अंधश्रध्दा पेरुन साबण कंपनी काय साध्य करणार आहे...?
कुठल्या साबणाने त्वचा मुलायम होते ही सुध्दा अंधश्रध्दाच ना. मुळात त्वचेला, पोषक झोप या गोष्टी मिळाल्या की त्वचा तेजस्वी दिसणारच... अशा कित्तीतरी जाहिराती बघून पटत नाहीत.. पण लोक यांच्या आहारी जाऊन खरेदी मात्र करत रहातात..! आपण नीरक्षीरविवेक मात्र करत राहू. होय ना.?
चलते जायेंगे सचकी राहमें अकेले..
लोग जुडते जाएगें...
सोच बदलती जाएगी....
आमेन...!!!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)