वारंवार बलात्कारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती

अहमदनगर - प्रेमाची फूस लावून अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही मुलगी 33 आठवडय़ांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. पीडितेने व तिच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार करु नये म्हणून मोठा दबाव टाकण्यात येत होता. परंतु चाईल्डलाईन संस्था खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.


याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांनी विशाल भापकर (रा. टाकळी खातगाव, ता. नगर) व संतोष चितळकर (रा. भाळवणी) यांना अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 2019 साली गणेशोत्सवानंतर आयोजित केलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमास जात असताना तेथे मंडप लावलेला विशाल भापकर याने तिच्याशी ओळख वाढविली. 

तिच्याशी फोनवर वारंवार संपर्क करून तिला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. त्यानंतर पीडितेला तिच्याच शेतामध्ये भेटून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दुसरीकडे संतोष चितळकर यानेही पीडितेला दुचाकीवरून शाळेत सोडण्याच्या बहाण्याने तिच्याशी ओळख वाढविली. फोनवर वारंवार संपर्क करून तिला तिच्याच शेतामध्ये भेटून अत्याचार केला. यामुळे पीडित मुलीस गर्भधारणा झाली. 

ही बाब तिच्या घरी लक्षात आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती ३३ आठवडे व ६ दिवसांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सागितले. त्यानंतर पीडितेने घरातील सदस्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात येऊन दोघांविरोधात फिर्याद दाखल केली. दोघाही आरोपींविरोधात बाललैंगिक अत्याचार, बलात्कार, विनयभंग या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने व तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल करु नये, म्हणून आरोपींच्या वतीने कुटुंबावर खूप दबाव टाकण्यात येत होता. परंतु, चाईल्डलाईन संस्थेचे सदस्य तेथे पोचले. त्यांनी कुटुंबियांना आधार देवून त्यांचे मानसिक समुपदेशन केले. त्यानंतर धाडस दाखवत याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. पीडितेस नगर येथील स्नेहालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !