अहमदनगर - नगर जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. नगर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी नगर ते वांबोरी रस्ता पावसाच्या पाण्यामुळे ठप्प झाला.
(आमचे यु़-ट्युब चॅनल सबस्क्राईब करा)
नगर ते वांबोरी रस्त्यानजीक पिंपळगाव माळवी तलाव आहे. या तलावात गर्भगिरीच्या डोंगररंगातून वाहणारे पाणी येत असते. ज्या ओढ्याने हे पाणी तलावात येते, त्या रस्त्यावर इंग्रजांच्या काळात बांधलेला एक दगडी पूल आहे.
जुन्या काळात बांधलेल्या या दगडी पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे अनेकदा पावसाचे पाणी येऊन या ओढ्याला पूर आला तर या दगडी पुलावरुन पाणी वाहते. गुरुवारी सकाळी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.