रंगवलेल्या दगडात म्हणे देव आहे..
माणसाच्या शरीरात,
माणूस अंर्तधान आहे....
म्हणून देवळात,
पायदळी जाणारा नैवेद्य आहे...
लेकराच्या पोटातील भूक
त्याला चोर बनवते आहे...
जर....
करता आला त्या भूकेचा खून.....
तर सारेच आरोपी होतील.
मग न्याय मागायला ते कुठे जातील ?
पिंडाला माणसाची नाही,
कावळ्यांची आस आहे...
जिवंत असलेल्या लेकराला
भूक नावाच्या चेटकिणीचा फास आहे..
जर खून करता आला भूकेचा..
तर सारेच आरोपी होतील...
मग न्याय मागायला ते कुठे जातील ?
देवळात बडव्यांची हुकूमशाही आहे..
लेकराच्या पोटात 'भूक' ही चेटकीण आहे...
जर खून करता आला भूकेचा..
तर सारेच आरोपी होतील.
मग न्याय मागायला ते कुठं जातील ?
फांदीवरच्या कावळ्याला...
दगडाच्या देवाला...
खायला पोळी आहे...
लेकराच्या नशीबाला भिकेची झोळी आहे...
जर करता आला 'खून',
त्या भूकेचा........
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)