रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४६ टक्के
अहमदनगर - जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे.
दरम्यान, मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, अकोले ३३, जामखेड २३, कर्जत २१, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ३६, नेवासा २६, पारनेर ३३, पाथर्डी ३६, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ५२, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १०, इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या - ५०,९१८
उपचार सुरू असलेले रूग्ण - १,६०६
मृत्यू - ८१३
एकूण रूग्ण संख्या - ५३,३३७