मी अश्या देशात राहतो ज्या देशात मला न्यायासाठी भीक मागावी लागते... आपण एवढे कठोर मनाचे का झालोत की आपल्याला राग येत नाही. आवाज दाबण्यासाठी जीभ कापली जाते... सन्मानाचा कणा मोडला जातो, एवढा राग क्रूरता कोण शिकवतं, कशी तयार होते..
काय आपल्यात थोडीपन दया, सहानुभूती शिल्लक नाही का ? माणुसकी गोस्ट अस्तित्वात आहे का नाही हाच प्रश्न पडतो. माणसाला कमीतकमी सन्मानाने, शांततेत जगायचा अधिकार आहे का नाही. न्याय..? पण न्याय नक्की मिळतो का ..? आणि जरी मिळाला तरी त्या वेदना, ते दुःख, गेलेला निष्पाप बळी परत मिळणार आहे का ?
राम राज्य.. राम राज्य, नेमकं काय आहे राम राज्य ..? रामाच्या राज्यात सीता सुखी, सन्मानाने जगत होती का ? रामाच्या अहंकारपुढे सीतेला जगणं सोडावं लागलं हे आपल्या डोक्यात कधी घुसणार..?
हा अहंकार, माज, द्वेष, राग जो पर्यंत समाजात आहे तो पर्यंत हे संपणार नाही. माणसानं दयाळू असायला हवं, इतरांबद्दल सहानुभूती दाखवायला हवी, एकमेकांशी प्रेमानं वागायला हवं... बाकी 'रामराज्य' म्हणजे काय मला कळत नाही.
- विकास गोसावी (अहमदनगर)