अहमदनगर : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीनजीक ओढ्याला पावसाच्या पाण्यामुळे पूर आला होता. मिरी येथील एका युवकाने तरीही धाडस करीत त्यातून दुचाकी पुढे दामटली. पण पुराच्या पाण्यात तो वाहून जायला लागला.
या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचविले. युवकाच्या पत्नीने आरडा ओरडा केल्याने लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखुन व स्वतःचा जीव धोक्यात घालून या युवकाला वाचवले.