सध्याच्या या महामारीमधे बिनधास्तपने जगता येइना माणसाला, अन भितीने दबावानेचं माणसं जास्त
लागलीत मरायला.....
मार्च महिन्यापासुन या कोरोना महामारीला सुरुवात झाली. लोकांना वाटले आज संपेल ऊद्या संपेल, पण ही महामारी काय संपता संपेना. खरं म्हणजे ही आपल्या म्हणजेच माणसांच्या चुकांमुळे संपेना. याला प्रशासन किंवा कुणीही थांबवु शकत नाही. याला आपण माणसचं थांबवु शकतो.
नोकरी करणारी हातावर पोट भरणारी मंडळी भाजी विक्रेते हे तर घरात थांबु शकत नाही. पण घरातुन बाहेर पडणारया प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले तर नक्कीच हा कोरोना आटोक्यात येइल. कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याला कारणीभुत आपणच आहोत
फेसबुक हाँटस्अँपला भावपुर्ण श्रद्धांजली अस वाचले की काळजात धस्स होतंय. तरुण गेला तर अजुनच जीव कासावीस होतोय. एवढ सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो तरी काही मुर्ख लोकांचे मास्क नाकाला नसते तर ते हनुवटीला अडकवलेले असते. खणकन् कानाखाली ओढावी वाटते अशा लोकांच्या.
मुर्खांनो तुमच्या बेजबाबदार वागण्यामुळे निरपराधांचा घरातील कर्त्या व्यक्तीचा बळी जात आहे. खुप सोपे वाटते काही लोकांना, पण काळजी घ्या. विनामास्क घराबाहेर पडु नका. चुकुन कोरोनाची लागण झालीच तर घाबरुन जाऊ नका. नियम पथ्य पाळले तर कोरोना नक्कीच बरा होतो आणि आपल्या सर्वांना विनंती, आपण सगळे मिळुन कोरोनाला नक्कीच हरवणार आहोत. ते कसे ??
काळजी घेऊन काम असेल तरच घराबाहेर पडणे. गर्दीचे ठिकाण टाळणे, विनामास्क बाहेर न जाणे, या गोष्टी आपल्याच हाती आहेत. म्हणजेच कोरोना न होऊ देने हे पण आपल्याच हाती आहे. अनेक लोकांना घाबरुन दबाव येत आहे. बिनधास्त मनमोकळेपणाने सध्याच्या या काळात माणुस जगेना. घरात बसुन बसुन मानसिक आजार जडतो कि काय असं वाटतंय अनेकजणांना.
थोडा ताप खोकला सर्दी झाली तरी तणावाखाली जगतोय माणुस. लगेच वाटते कि आपल्याला कोरोना तर झाला नसेल ना ! भितीच्या छायेखाली जगतोय माणुस. अनेक लोकांनी भितीपोटी आत्महत्या केल्या. इतर वेळी आलेल्या संकटांना आपण सामोरं जातो.
त्यांना पालापाचोळ्यासारखं धुडकावुन लावतो. मग जरी कोरोनाची लागण झाली तरी घाबरु नका आणि घाबरुन आत्महत्येचा विचार करु नका. काळजी घेउन आपण सर्वजण मिळुन नक्कीच हरवणार आहोत या महामारीला.
एकच सांगावे वाटते, मास्क हे हनुवटीला नव्हे तर नाकालाच बांधा. सार्वजनिक ठिकाणी गेलांच तर कुठेही स्पर्श करु नका. आपल्या छोट्या छोट्या चुकांची सजा इतर निरपराधांना व्हायला नको. आपण जबाबदार जागरुक नागरीक आहोत. आणि हो, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर ते मावा गुटखा खाउन पचापच थुंकणे बंद करा. तुमच्या या घाणेरड्या सवयींमुळे दुसरया निरपराध व्यक्तींना धोका होउ शकतो.
प्रशासनाला दोष न देता त्यांना सहकार्य करा. त्यांनाही लेकरंबाळ घरसंसार आहे, तरीही ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालुन काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या घरातच थांबा.
शब्दांकन - आशा पाटील
अहमदनगर