अनुजा पटाईत - मनाला स्पर्शून आतील दुःख, तणाव, आणि नकोशा भावना बाहेर काढून सकारात्मकता, प्रेम, आयुष्य जगण्याची नवी उमेद भरणारा कार्यक्रम म्हणजे "हील विथ सुकन्या".
आयुष्य नेहमीच गुलाब पाकळ्यांनी सजलेल्या रस्त्यावरचा प्रवास असू शकत नाही. नेहमीच फक्त चांगलं काही आयुष्यात घडेल असेही नाही. पण, काही वाईट घडले तर, उद्याचा सूर्य नवे आणि छान काही आयुष्यात आणणारच नाही! असा विचार करणे बरोबर ठरेल का? तर नाही.
प्रवासात खाचखळगे, चढ उतार असणारच ! रहाट पाळण्यात बसल्यावर वर जाताना आणि उंचावरून धबधब्याप्रमाणे खाली येताना असणारी मजा वेगवेगळी आहे. आयुष्याची गाडी उतारावर असताना, आपल्याला आपण किती चांगले चालक आहोत हे दाखवण्याची संधी मिळालेली असते.
या संधीचे सोनं करण्याची धमक जी तुमच्यात आहे, तिच्याशी गट्टी करून देणारा कार्यक्रम म्हणजे "हील विथ सुकन्या"! मानसिक आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक दृष्टीने सुद्धा मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे आहे.
ते कसे? काय करावे? नेमके निराशेतून आशेकडे कसे जावे? वाईट अनुभवातून नवा प्रवास कसा सुरू होऊ शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सुकन्या फणसळकर मॅडम देतीलच ! लवकर enroll व्हा ! आणि आनंदी आयुष्याच्या दिशेने वाटचाल सुरू करूयात.