धक्कादायक ! नवी दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला

नवी दिल्ली - एनआयए संस्थेने बंगाल आणि केरळ येथून अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी मोठा हल्ला करणार होते. परंतु, सतर्कतेमुळे दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट उधळला गेला आहे. ताब्यात घेतलेले दहशतवादी अल कायदा संघटनेशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. 


पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथून अलकायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, या लोकांवर दिल्ली एनसीआर आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी सोपवली होती.
 
एनआयएची कारवाई अजूनही सुरूच आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये लियु यीन अहमद आणि अबु सूफियान पश्चिम बंगालचे, तर मुशर्रफ हुसेन आणि मुर्शीद हसन केरळचे आहेत. दहशतवादाबाबत दोन महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने एक अहवाल जारी केला होता. केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येने आयएस दहशतवादी असू शकतात असा इशारा यात दिला होता. 

भारतीय उपखंडात अल कायदा (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याचा कट रचला आहे, असा दावाही अहवालात केला होता. एक्यूआयएसचा सध्या मुख्य सूत्रधार ओसामा महमूद आहे, त्याने आसिम उमरची जागा घेतली आहे. ओमरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो या भागात कट रचत आहे. 

भारतीय उपखंडात अल कायदाचे 180 ते 200 दहशतवादी आहेत. ते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील आहेत. भारतीय उपखंडात अल कायदा हा आयएसचा सहकारी आहेत, अशी माहिती आयएसच्या मदतनीस देशाने दिली होती. तसेच यूएनच्या अहवालात भारताला इशारा देण्यात आला होता.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !