अहमदनगर - शहरातून जाणाऱ्या मनमाड महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. हा राज्य महामार्ग असला तरी या रस्त्याची अवस्था खेड्यातील व शेतातील रस्त्यापेक्षा वाईट झाली आहे.
नगरमधील युवक केतन कोते पाटील याने थेट या महामार्गावर जाऊन सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण केले आहे. मिश्किल शैलीत केतन याने या रस्त्याची वास्तविकता दर्शवली आहे.
मनमाड रस्त्यावर गुडघाभर खड्डे झाले असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात धरून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती केतन याने विनोदी शैलीत दाखवून प्रशासनाच्या ढिम्म पणावर बोट ठेवले आहे.