अहमदनगर - अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. अखिलेश कुमार सिंग यांनी काही महिन्यांपूर्वीच नगरच्या पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. परंतु, अवघ्या तीन ते चार महिन्यांतच त्यांची बदली झाली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय असे काम त्यांनी केले असून 15 ऑगस्ट 2018 ते 26 जानेवारी 2019 या वर्षाचा शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पोलिस शौर्यपदकासाठी उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती यांच्या कडून पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते.
तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना 26 जानेवारी 2019 रोजी गुणवत्तापूर्ण सेवेतील पोलिस म्हणून राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले होते. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हे गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याचे राष्ट्रपती पदक पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.