पुणे - उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज पहाटे सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी अजित पवारांनी सर्व कामाची पाहणी केली यासोबतच संत तुकारामनगर ते एचए कंपनपर्यंत त्यांनी प्रवासही केला.
अजित पवार हे वेळेचे पक्के आहेत. नियोजित वेळेत ते कामाच्या ठिकाणी हजर होत असतात. आजही पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी अगदी वेळेत हजर झाले. पहाटे सहा वाजताच ते फुगेवाडीला दाखल झालेले होते. पहाटेच सर्व अधिकारी आणि कर्मचारीही कामाच्या ठिकाणी हजर झाले होते.
पाहणी करुन घेतली बैठक - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. संपूर्ण कामाची पाहणी केली. यासोबत ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. यानंतर ते संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे रवाना झाले. तिथे त्यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केली.