मुंबई - सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. परवा त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अटक झाल्यानंतर आणखी एक खुलासा समाेर आला आहे. रियाने ड्र्ग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. तसेच बॉलीवूड पार्ट्यांबदद्ल देखील माहिती दिली आहे. यामध्ये बॉलीवूडचे काही कलाकार देखी ड्रग्ज घेण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे.
रियाने नार्कोटिक्स ब्युरोच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूड पार्ट्यांबद्दलही खुलासा केला आहे. रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील अशा काही पार्टीजबद्दल खुलासा केला आहे कि जिथे ड्रग्जचा वापर सर्रास केला जातो. म्हणजेच या पार्ट्यांमध्येय २५ कलाकार देखील ड्र्ग्ज घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे या माहितीच्या आधारे, २५ हिरो-हिरोईनचे डोजियर तयार करण्यात आले आहे. या सर्वांना एक-एक करुन समन्स पाठवले जाईल आणि चौकशीसाठी एनसीबी ऑफिसमध्ये बोलावले जाईल. मात्र, अद्याप कोणतेही नाव समोर आले नाही. पण लवकरच या कलाकारांची देखील चाैकशी होणार असल्याचे स्पष्ट आहे. यावरुन बॉलीवूडची पडद्यामागची काळी बाजू आता उजेडात येणार आहे.