राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २६ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३६४ घटना झाल्या आहेत. त्यामध्ये ८९५ व्यक्ती ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
तसेच तक्रारींसाठी १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार २९३ इतके आहेत. तर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल असलेले गुन्हे – १३४७ इतके आहेत.
कोरोना जमावबंदी कालावधीत जप्त केलेली वाहने – ९६, ४३० इतकी आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २१७ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २४१ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.
पोलिसांना कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.