गौरव संदेश पाठवून आठवले यांनी केले कौतुक
पिंपरी-चिंचवड - जनतेची सुरक्षा समोर ठेऊन पिंपरी-चिंचवड शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी माझे अधिकार पूर्णपणे पणास लावेल. शहरातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी मी तत्पर राहील. त्यासाठी नागरीकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
पोलिस आयुक्त पदाची सूत्रे कृष्ण प्रकाश यांनी नुकतीच स्वीकारली. आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेऊन आठवले यांनी पाठविलेले लेखी स्तुती व शुभेच्छा पत्र माजी नगरसेवक हमीद शेख व आरपीआय (आठवले गट) वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अधक्ष अजीज शेख यांनी कृष्ण प्रकाश यांना आयुक्त कार्यालयात प्रदान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचा सत्कारही केला. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.