भारतीय क्रिकेट संघातील माजी ऑलराउंडर खेळाडू युवराज सिंग याने गेल्या २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला निवडले गेले नसल्याबद्दल खुलासा केला आहे. युवराज सिंगने सांगितले आहे की, त्या विश्वचषक सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये त्याची निवड होणार नाही, हे त्याला आधीच समजले होते. ही गोष्ट त्याला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितली होती.
युवराजने त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना सन २०१७ मध्ये वेस्टइंडीज दौऱ्याच्या वेळी खेळला होता. तर सन २०१९ मध्ये त्याने क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला होता. याबाबत युवराज म्हणाला की, ‘मी पुनरागमन केल्यावर विराट कोहलीने समर्थन केले होते. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी परत येऊच शकलो नसतो. परंतु, धोनीने त्याच वेळी सांगितले होते की, त्याच्या बाजूने शक्य तितका प्रयत्न करुनही युवराजचा संघात सहभाग होऊ शकत नाही. कारण निवड समिती त्याच्या नावाचा विचारच करत नाहीत.