जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन आणि शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयात २५ बेडचे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आयसीयु विभाग, भारतीय जैन संघटनेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेला मिशन झीरो उपक्रम' आणि जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबच्या चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई- प्रणाली द्वारे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आधी मान्यवर या कार्यक्रमात ई-प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धूत चॅरिटेबल ट्रस्टचे अनुराग धूत, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे उपस्थित होते.
अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे वेळीच लक्षणे आढळणार्या रुग्णांना शोधून त्यांच्यावर आपण उपचार करत आहोत. चाचण्यांची संख्या वाढत आहेय राज्यात प्रयोगशाळांची संख्या आता वाढली आहे. आपण हे सर्व प्रयत्न करतो आहोत. याला सामाजिक संस्था पुढे येऊन सहकार्य करीत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.