गुड न्यूज ! नाशिकला आता अखंडित वीजपुरवठा

नाशिक - महावितरणच्या नाशिक परिमंडळातर्गत नाशिक शहर विभाग २ मधील शिखरेवाडी सबस्टेशन अंतर्गत एकलहरे येथे जिल्ह्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आकाराला येत आहे. यामुळे लवकरच नाशिकच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होणार आहे. शिवाय वीज फिडर ट्रीप होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.


गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमुळे पारंपरिक सबस्टेशनपेक्षा दहा पटीने जागा कमी लागते. देखभाल व दुरुस्ती खर्च अत्यल्प येतो. फिडर ट्रीप होण्याचे प्रमाण शून्यावर येते. सबस्टेशनवरील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढते. त्यामुळे या भागातील वीज ग्राहकांना या सबस्टेशनचा फायदा होणार आहे. शहराच्या या पूर्व भागाचा वेगाने विकास सुरू असून भविष्यातही या भागात विकासाला मोठी संधी आहे.

२२० केव्ही आणि त्याहून जास्त अतिउच्च दाबाच्या वीज वितरण केंद्रांसाठी आतापर्यंत वापरले जात होते. आता हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे तंत्रज्ञान आता ३३ बाय ११ केव्हीच्या वीज उपकेंद्रासाठी वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानावर आधारित एकलहरे येथे उभारले जात असलेले वीज उपकेंद्र जिल्ह्यातील पहिले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन ठरणार आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !