गुड न्यूज ! निळवंडे धरण भरले, रंगीबेरंगी पाणी बरसले

अहमदनगर - अकोले तालुक्यातील निळवंडे धरण सध्या ८३ टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून प्रवरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

सन १९९९ मध्ये निळवंडे धरणाचे बांधकाम सुरू झाले आणि सन २०११ मध्ये धरण अस्तित्वात आले. या धरणाची उंची २४२.५ फूट इतकी आहे. मध्यंतरी या धरणची उंची वाढवण्यात आली होती.

प्रवरा नदीवर बांधलेल्या या धरणाचा उपयोग अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांना होतो. धरणाचे बांधकाम पूर्णपणे आरसीसी आहे. 

नुकतेच यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची चांगली आवक सुरू होती. काल हे धरण ८३ टक्के भरल्यामुळे प्रवरा पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

प्रवरा नदीकाठच्या गावांना तसेच नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधगिरीचा इशाराही दिलेला आहे. धरणाचे पाणी सोडताना काढलेला हा व्हिडीओ रंगीबेरंगी लाईटमुळे अजून खुलून आलेला दिसत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !