नुकताच 'ओटीटी प्लॅटफॉर्म'वर 'गुंजन सक्सेना' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमावर बऱ्याच तर्क लोकांनी कॉमेंट केल्या आहेत. अर्थातच त्या निगेटिव्ह असतील हे नव्याने सांगायला नको. कदाचित या सिनेमामध्ये जान्हवी कपूर आहे आणि प्रोडकशन कंपनी 'धर्मा प्रॉडक्शन' आहे, एवढीच गोष्ट पुरेशी झाली असेल. पण या दोन घटकांचा विरोध करताना पंकज त्रिपाठींचा किती लोकांनी विचार केला ? 'सडक २'चा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हाही हीच गोष्ट झाली.
(Image Source : groundreport.in) |
आपण '#नेपोटिजम'च्या नावाखाली कोणत्याही गोष्टींचा सखोल विचार न करता फक्त एका 'ट्रेंड'चा भाग होतोय. विचार केला तर नेपोटिजम कुठे नाही? आज प्रत्येक फिल्डमध्ये ही गोष्ट आहेच. मग जर विरोध करायचाच आहे, तर प्रत्येक ठिकाणी व्हायला हवा. एक चित्रपट लिहून पुढील सर्व पक्रियांमधून जाऊन अगदी प्रदर्शनापर्यंत शेकडो लोक त्यासाठी काम करत असतात. त्यांचा विचार कोण करणार?
खरंतर सुशांतच्या मृत्यूसंबंधी तर्क, तथ्य यांचा विचार न करता मीडिया काठी वर करून जिकडे दिशा दाखवेल तिकडे मेंढरामागे पळाल्यासारखे एकापाठोपाठ सगळे जातायेत, पण या नेपोटिजम विरोधाच्या लाटेमध्ये निर्दोष बळी नाही पडले म्हणजे कमवलं. फक्त 'स्टार कीड' (अभिनेत्यांची मुलं) म्हणुन विरोध करताना आपण त्यांच्या कलेकडे दुर्लक्ष करतो, हे लक्षात येत नाही.
आलीया भट, श्रद्धा कपुर, रणबीर कपुर यांचे सिनेमे जर पाहिले, तर त्यांनी साकारलेली भूमिका इतर कोणी साकारू शकेल, असे मला तरी वाटत नाही. माझ्या दृष्टीने घराणेशाही चुकीची नाही. फक्त स्वतःच्या लोभासाठी कार्यक्षम व्यक्तीचे हक्क डावलून ते अकार्यक्षम व्यक्तीला देणे हे चुकीचेच. #IStandAgaintNepotism, I stand with etc etc.. पण कुठं ? स्टँड कुठाय नेमका तुमचा ? घरात सोफ्यावर बसून की पलंगावर झोपून ?
- योगिता सूर्यवंशी (अहमदनगर)