मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने केलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी औरंगाबाद शहरातून एका युवकाला ताब्यात अटक केली आहे. या युवकाने सोनाक्षी सिन्हाच्या एका व्हिडिओवर वाद्रस्त प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सोनाक्षीने त्याला धडा शिकवण्यासाठी थेट सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पाेलिसांनी औरंगाबादमधून एका २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस प्रॉम्प्ट एक्शन अगेन्स्ट हॅरॅसर्स’ या हॅशटॅगनं एक व्हिडिओ शेअर केला होता. खरं तर सोनाक्षीने एक विशेष मोहिम राबवली होती. परंतु, या व्हिडिओवरुन औरंगाबाद शहरातील शशिकांत जाधव या तरुणाने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली हेाती. त्याने सोनाक्षीच नाही, तर इतर कलाकारांबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली होती.
सोनाक्षीने या युवकाच्या विराेधात ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने याची गंभीर दखल घेतली. संबंधित युवकाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सोनाक्षीच्या तक्रारीवरुन जाधव याच्याविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.