राज्यात पाच लाखांहून अधिक रुग्ण बरे - आरोग्यमंत्री

मुंबई - राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. 

सध्या १ लाख ६८  हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, काही लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !