मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, 'अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया'. अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकले. याच त्यासाठी अविनाश जाधव यांनी आंदोलन केले होते.
आंदोलन करणे हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. असेही संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. असली हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, असेही देशपांडे म्हणाले.