नांदेड - नांदेडमध्ये कोरोनाने आपले स्वरुप वाढवत नेले आहे. आता लोकप्रतिनिधींना विळखा घातल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीलाच येथे चार आमदारांना कोरोनाची लागण झालेली होती. आता भाजपचे खासदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या खासदारांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही पिता पुत्रावर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मार्च महिन्यापासून दोन्ही पिता-पुत्र दोघेही मतदारसंघात कोरोना स्थितीचा आढावा घेत होते. याचवेळी त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. म्हणूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. मात्र या दोघांच्याही आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे आणि काँग्रेसचे विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांनी कोरोनावर मात केली. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर यांची गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. नेत्यांनाच कोरोनाने विळखा घातल्यामुळे नांदेडकर सध्या चिंचेत आहेत.